21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादतेर येथील आठवडी बाजारातून २ दुचाकी चोरीला

तेर येथील आठवडी बाजारातून २ दुचाकी चोरीला

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शहरी भागात असलेले दुचाकी चोरीचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत आले आहे. चोरटे फक्त नवीन दुचाकी चोरत आहेत. जुन्या दुचाकीकडे पहातही नाहीत.अशीच दुचाकी चोरीची घटना तेर ता. उस्मानाबाद येथील आठवडी बाजारात घडली आहे. २५ जुलै रोजी बाजारातून दोघांच्या दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात १ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. २५ जुलै रोजी खंडु जयदेव पाडोळे रा. मोहतरवाडी यांची टीव्हीएस मोटारसायकल क्र. एम.एच. २५ एआर १५०१ व तेर येथील गोविंद बबन माने यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. १२ एफएन ६५०३ या दोन्ही दुचाकी बाजारात लावल्या होत्या. चोरट्यांनी दोघांच्या दोन मोटारसायकल तेर येथील आठवडी बाजारातून लंपास केल्या आहेत. या प्रकरणी खंडु पाडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांच्या विरोधात १ ऑगस्ट रोजी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या