23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeउस्मानाबादपरंडा येथे २ लाख ८० हजारांनी ऑनलाईन फसवणूक

परंडा येथे २ लाख ८० हजारांनी ऑनलाईन फसवणूक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : परंडा येथील एका बँक खातेदाराची अनोळखी व्यक्तीने फोन करून क्रेडीट कार्डची माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्याच्या बँक खात्यावरून २ लाख ८ हजार ६५२ रूपये ऑनलाईन लंपास करण्यात आले. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात १२ ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा येथील जिलानी बांगी यांचे वडील महेबुब बांगी यांच्या मोबाईलवर ६ ऑगस्ट रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला. त्या कॉलवरील अज्ञात व्यक्तीने मी राहुल सिंग क्रेडीट कार्ड ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असून आपले बंद पडलेले क्रेडीट काड चालू करायचे आहे. त्यासाठी तुमच्या क्रेडीट कार्डची माहिती द्या, असे सांगीतले.

यानंतर जिलानी बांगी यांनी खात्री न करता आपल्या क्रेडीट कार्डवरील अंक व सीव्हीव्ही कोड त्या अनोळखी व्यक्तीस सांगीतला. यानंतर जिलानी यांनी आपल्या वडीलांच्या मोबाईलवर आलेल्या लघु संदेशातील ओटीपीही त्या व्यक्तीस सांगितला. त्यानंतर त्या व्यक्तीने बांगी यांच्या बँक खात्यातील एकुण २ लाख ८ हजार ६५२ रूपये रक्कम तीन व्यवहारांत ऑनलाईन पध्दतीने अन्य खात्यावर स्थलांतरीत करुन बांगी यांची फसवणूक केली. या प्रकरणी जिलानी बांगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या