27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeउस्मानाबादश्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणार्‍या २० बालकांना पथकाने ताब्यात घेतले

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणार्‍या २० बालकांना पथकाने ताब्यात घेतले

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : येथील श्री. तुळजाभवानी मंदिर परिसर व शहरात भीक मागणार्‍या २० बालकांना शुक्रवारी दि. २३ सप्टेंबर रोजी पथकाने ताब्यात घेतले. बालकांमध्ये ४ मुली व १६ मुलांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या बालकांना बालकल्याण समितीकडे सोपविण्यात येणार आहे.

श्री तुळजाभवनीचा शारदीय नवरात्र महोत्सव तोंडावर आला आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात व महाद्वाराच्या समोर तसेच शहरात बालभिक्षेकरी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यांच्याकडून भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. बालभिक्षेकरी संदर्भात तहसीलदार तथा बाल संरक्षण समिती अध्यक्ष सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. भिक मागणार्‍या मुलांना रेस्क्यू करण्यासाठी बाल संरक्षण समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले. दुपारी १२ ते २ पर्यंत शहरात व मंदिर परिसरात रेस्क्यू मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ४ मुली व १६ मुले ताब्यात घेण्यात आली.

ताब्यात घेतलेली मुले बालकल्याण समितीकडे सोपविण्यात येणार आहेत. या मोहिमेत शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, तहसील प्रशासन, चाईल्ड लाईन या विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. बाल भिक्षेकर्‍यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्या त्रासाचे स्वरूप भविण्यात मोठे रूप घेणार आहे. एखाद्या भाविकाने भिक नाही दिली तर ते बाल भिक्षेकरी त्या भाविकांना अपशब्द (शिवीगाळ) करण्यास कमी करत नाहीत. त्यासाठी संबंधित विभागाने सतर्क राहून आपापल्या जबाबदार्‍या पार पाडण्याचे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या