24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबादअणदूरमध्ये ४ जणांना कोरोनाची लागण, ४ दिवसाचा जनता कफ्यू

अणदूरमध्ये ४ जणांना कोरोनाची लागण, ४ दिवसाचा जनता कफ्यू

एकमत ऑनलाईन

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शानिवारी गावातील ३ पुरुष, १ महिला कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गावात चार दिवसाचा जनता कर्र्फु लागू करण्यात आला आहे.

अणदूरमधील एका व्यक्तीला सोलापूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये त्याच कुटुंबातील एका व्यक्तीचा समावेश आहे. गावात प्रथमच पाँजिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावातील नागरिकांची चिंता  वाढली आहे. रविवारी कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींना स्वँब घेण्यासाठी तुळजापूर येथे पाठविले आहे. तसेच सोमवारी अणदूरमध्ये आणखी २ कोरोना बाधित व्यक्ती आढळून आले आहेत. तर नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.

नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, सँनिटझर व साबणाने हात स्वच्छ करावेत असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी केले आहे. रविवारी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी अणदुर येथे भेट दिली. यावेळी विस्तार अधिकारी के.बी.भांगे, मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी विलास कोल्हे, ग्रामसेवक देविदास चव्हाण, बीट अमलदार यु.एल माळाळे, एस.एस.सोनवणे आदीसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच सोमवारी सकाळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट दिली.

यावेळी जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, सभापती मुळे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, दिपक आलूरे, दयानंद मुडके आदी उपस्थित होत. ग्रामपंचायताकडून खबरदारीचा उपाय म्हणून तो परिसर सील बंद केला आहे. २१ व्यक्तींना हाय रिस्क होमकॉरंटाईन करण्यात येणार आहे. गावातील इतरही नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे सरपंच सरिता मोकाशे यांनी सांगितले.

Read More  महापालिका आयुक्तांना वृत्तपत्र विके्रत्यांचा घेराव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या