22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादविद्यापीठ उपकेंद्र परिसरात ४० कोटीची कामे मार्गी

विद्यापीठ उपकेंद्र परिसरात ४० कोटीची कामे मार्गी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात गेल्या ४ वर्षात ४० कोटी रुपयांच्या निधीतून विविध इमारतीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. अशी माहिती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीत सोमवारी दि. २९ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद झाली. यावेळी निंबाळकर यांनी माहिती दिली. उपकेंद्राचे संचालक प्रा. डॉ. दत्तात्रय गायकवाड, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले की, उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्र ६० एकर जागेत उभारण्यात आले आहे. आजरोजी विविध ११ विभाग सुरू असून ६७० विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. प्रशासकीय इमारत, विज्ञानभवन, मुलींचे वसतीगृह, उपहारगृह, अतिथीगृह आदी इमारतींची कामे पूर्ण झालेली आहेत. कोरोना महामारी काळात उपकेंद्रात लोकसहभाग व विद्यापीठ सहभागातून २.५० कोटीची कोरोना तपासणी लॅब उभारण्यात आली आहे. मुलांचे वसतीगृह, संचालक निवासस्थान, ग्रंथालय इमारत, व्यवस्थापनशास्त्र इमारत आदी कामे प्रगतीपथावर आहेत.

तलाव खोलीकरण, कुपनलिका, विहीरीचे काम, सौरऊर्जा प्रकल्प, मुख्य रस्ता, विज्ञानभवनाकडे व मुलींच्या वसतीगृहाकडे जाणारा काँक्रीट रस्ता ही कामे पूर्ण झालेली आहेत, परिसरात विविध प्रकारची ५ हजार ५०० झाडांची लावगवड करून त्याला ठिबक सिंचन बसविण्यात आले आहे. झाडांची चांगल्या प्रकारे जोपासणा झाली आहे. उपकेंद्राच्या परिसरात जवळपास ४० कोटी रुपयांची गुणवत्तापुर्ण व दर्जेदार विकासकामे विद्यापीठाच्या निधीतून पूर्ण करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र शासनाने ३० कोटींची तरतूद केली तर पूर्ण विद्यापीठ लवकरच होवू शकते, असे निंबाळकर म्हणाले.

सध्या उपकेंद्रात बायोटेक्नॉलॉजी, मायक्रो बॉयालॉजी, केमेस्ट्री, वॉटर अ‍ॅन्ड लॅन्ड मॅनेजमेंट, एमबीए, एमसीए, एमएड, इंग्रजी, लोककला व नाट्यशास्त्र, फिजीक्स, मॅथेमॅटीक्स हे ११ विभाग सुरू आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय झाली आहे. विद्यापीठ उपकेंद्रात माती व पाणी परिक्षण करण्यासाठी सुसज्ज लॅब तयार असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निंबाळकर यांनी केले.

आज उपकेंद्रात जीवनसाधना सन्मान सोहळा
विद्यापीठ उपकेंद्रात ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनसाधना सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण, विज्ञान, वैद्यकीय सेवा, संशोधन व समाजकार्य, साहित्य लेखन, प्रशासन, प्रशासकीय सेवा, क्रिडा, विधी या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या मान्यवरास जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थीनी वसतीगृहाचे उद्घाटन व विद्यार्थी वसतीगृह व संचालक निवासस्थानाचे भूमिजूजन होणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या