30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या असून ११ हजार ७३३ विद्याथ्र्यांनी हजेरी लावली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनीही जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव, कळंब तालुक्यातील येरमाळा, उस्मानाबाद तालुक्यातील येडशी या शाळांना भेटी देऊन शालेय परिसर, वर्गखोल्या व कोव्हीड-१९ च्या पाश्र्वभूमीवर शाळेत केलेल्या उपाययोजनांची पाहणी करुन शिक्षकांना मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी गजानन सुसर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या १० नोव्हेंबर च्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग असलेल्या ४९१ शाळांपैकी ४४५ शाळा सुरू झाल्या असून ८०२९२ विद्यार्थ्यांपैकी ११७३३ विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत उपस्थित होते. इयत्ता नववी ते बारावी वर्गांना अध्यापन करणाèया ३५१९ शिक्षकांपैकी ३३१३ शिक्षकांची कोव्हीड-१९ चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ६९ शिक्षक कोरोना पॉझिटिव निघाले आहेत. तसेच माध्यमिक शाळांमधील १३७३ शिक्षकेतर कर्मचा-यांपैकी १२०० शिक्षकेतर कर्मचा-यांची चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये १४ शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाले आहेत. उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाèयांची कोरोना चाचणी पूर्ण करण्यात येत आहे. शाळेत उपस्थित सर्व ११७३३ विद्याथ्र्यांच्या पालकांचे आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्रही भरून घेण्यात आले आहे. सर्व शाळा व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला असून सर्व वर्गखोल्या सॅनिटाइझ करून घेण्यात आलेल्या आहेत.

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या