27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी भरला ५० कोटींचा विमा

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी भरला ५० कोटींचा विमा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : पिकावर येणारी सततची नैसर्गिक आपत्ती, रोगराई, अतिवृष्टी, पूर आदी संकटाचा दरवर्षी शेतकर्‍यांना सामना करावा लागत आहे. यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान होते. नुकसानी पासून वाचण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पिकांचा विमा उतरवून संरक्षण घेत आहे. यावर्षीच्या खरिप हंगामात जिल्ह्यातील ६ लाख, ६८ हजार १०३ शेतकर्‍यांनी ५० कोटी ९८ लाख ९१ हजार १०६ रुपयांचा विमा हप्ता भरून ५ लाख १ हजार ७१० हेक्टरवरील पिके संरक्षित केली आहेत.

जिल्ह्यात यंदा ९८ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सगळीकडे सारख्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. काही भागात पाऊस वेळेवर झाल्याने पेरण्या झाल्या होत्या तर काही भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. पेरणी झाल्यापासून सोयाबीन पिकांवर गोगलगाय, पैसा या किंडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पिके संकटात सापडली आहेत. दरवर्षी पिके काढणी व मळणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टी होवून पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी खरिप पिकांचा विशेष करून सोयाबीन पिकाचा पिकविमा मोठ्या क्षेत्रावर भरून संरक्षण घेतात.

सन २०२० मध्ये बजाज एलियांझ पिकविमा कंपनीने खरिप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही विमा देण्यास टाळाटाळ केली होती. ज्या शेतकर्‍यांनी अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाल्यानंतर कंपनीला आगाऊ माहिती देवून कळविले, अशा मोजक्या शेतकर्‍यांना पिकविमा रक्कम दिली. लाखो शेतकर्‍यांना नुकसान होवूनही जाणिवपुर्वक विमा दिला नाही. त्यामुळे २०२१ मध्ये खरिप हंगामात शेतकर्‍यांनी पिकविमा करण्याकडे कानाडोळा केला होता. तरीही ४० कोटी रुपयांचा विमा रक्कम भरून संरक्षण घेतले होते.

सन २०२२ मध्ये मात्र सरकारने विमा कंपनी बदलून भारतीय कृषी विमा कंपनीला हे काम दिल्याने यावर्षी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात विमा रक्कम भरून संरक्षण घेतले आहे. जिल्ह्यात २०२२ खरिप हंगामात ५ लाख ६८ हजार १०३ शेतकर्‍यांनी ५० कोटी ९८ लाख ९१ हजार १०६ रुपये विमा हप्ता भरून ५ लाख १ हजार ७१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे संरक्षण घेतले आहे. या एकूण क्षेत्राचे २५४० कोटी रुपयांचे संरक्षण आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या