धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील जवळपास ५० तरूणांची महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्समध्ये नोकरी लावतो म्हणून एका व्यक्तीने प्रत्येकाकडून सव्वालाख रूपये घेवून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील करकम येथील अनिल गिरिधर केदळे याच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात १३ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करकम, ता. पंढरपूर येथील अनिल गिरीधर केदळे याने तुळजापूर तालुक्यातील जवळपास ५० तरूणांना महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्समध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. प्रत्येक तरूणाकडून २० हजार रूपये व इतर खर्चासाठी एक लाख २५ हजार रूपये घेतले.
तरूणांनी अनिल केदळे याला १ ऑगस्ट १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत फोन पे, गुगल पे, पेटीएमद्वारे पैसे दिले. दिंडेगाव ता. तुळजापूर येथील अमोल विश्वनाथ पाटील, सुर्यकांत रोटे यांच्यासह पन्नास तरुणांना गंडा घातला आहे. या प्रकरणी अमोल पाटील यांनी दि. १३ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३७९ अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.