23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeउस्मानाबादव्हाटसअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मुलीला ८३ हजारांची मदत

व्हाटसअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मुलीला ८३ हजारांची मदत

एकमत ऑनलाईन

परंडा : तालुक्यातील टाकळी येथील पितृछत्र हरवलेल्या मुलीला व्हाट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ८३ हजारांची मदत करण्यात आली.टाकळी येथील संतोष मिस्किन या ४२ वर्षीय शेतक-याचे कोरोनाने निधन झाले आहे. घरातील कर्ता गेल्याने कुटुंब अस्थिर होऊन बिकट परिस्थिती झाली. या मदतीमुळे मुलीला आधार मिळाला आहे.गावातील व्यावसायिक, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबीयास मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले आणि ८३ हजारांची मदत जमा झाली.

स्व. मिस्किन यांच्या मुलीच्या नावे ही रक्कम एका बँकेत फिक्स करण्यात आली. संतोष मिस्किन गावातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारा उमदा युवक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पोलिस कर्मचारी नवनाथ भोरे यांनी व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. या माध्यमातून गावातील डॉक्टर, इंजिनिअर, सैनिक,शिक्षक, फार्मसिस्ट, पोलिस, उद्योजक, व्यावसायिक व इतर नोकरदार यांना एकत्र आणले. यातून जय अंबिका मदत निधी मंडळ स्थापन केले. मागील दोन-तीन दिवसांत ८३ हजार रुपये जमा झाले. कर्मवीर परिवार यांच्याकडून स्व. मिस्किन यांच्या तीन मुली व एक मुलांचे पालकत्व स्वीकारल्याचे संतोष बरचे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राहुल अंधारे यांनी स्वंयसेवी संस्थेचे यशवंत गोसावी यांच्याशी संपर्क करुन मिस्किन यांच्या मुलांची शिक्षणाची सोय केली. यासाठी डॉ. अर्जुन काळे, डॉ.तुकाराम काळे, सचिन काळे, बाबासाहेब काळे, उपसरपंच अनिल काळे, ज्ञानेश्वर गरड, मारुती भोरे, बालाजी लोंढे, ज्ञानेश्वर आदलींगे, भाऊसाहेब बारसकर, विजय जगताप, रामा काळे, रवींद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

मृग नक्षत्राची पहिल्याच दिवशी नांदेडात जोरदार सलामी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या