23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeउस्मानाबाद८५ वर्ष वृद्धेची कोरोनावर मात

८५ वर्ष वृद्धेची कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

उमरगा : उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी मागील १५ दिवसांपासून दाखल असलेल्या श्रीमती हारुबाई घोडके यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर कोरोणावर यशस्वीरित्या विजय मिळवला आहे.उमरगा येथील हारूबाई घोडके मागील पंधरा दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांना उमरगा येथील शासकीय उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या घोळके यांना उपचारासाठी दाखल करत असताना त्यांचे ऑक्सिजन ७० वर आले होते. त्यांच्या एच आर सिटी अहवालात त्यांना मागील कित्येक वर्षापासून दमा सदृस्य आजार असून त्यांचे फुपूस पूर्वीपासूनच कमी कार्यक्षम असल्याचे निदर्शनास आले. मागील चाळीस वर्षापासून त्या खोकला व दमा या आजाराने त्रस्त असून त्यावर उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. उमरगा शहरातील डॉ सतिश नरवडे यांच्या औषधोपचाराच्या मार्गदर्शनाने व उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. आळंगेकर, यांच्या मेहनतीने हारूबाई घोडके यांनी कोरोनावर मात केली.

पेटंटचे सोवळे, कोरोना अन् अर्थकारण!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या