कळंब : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोवीड – लसीकरण मोहिमेचा शुभारंभ इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांना पहिली लस टोचून करण्यात आला. जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. कुलदीप मिटकरी यांच्या उपस्थिती मध्ये पहिल्याच दिवशी नॊदणीकृत असलेल्या १०० व्यक्तींपैकी तब्बल ९२ व्यक्तींनी हि लस घेतली.
सकाळ पासूनच या लसीकरण मोहिमेचीच उत्सुकता सगळ्याना लागली होती. रुग्णालय परिसरात रांगोळी काढण्यात आली होती . त्याच बरोबर लसीकरण करून घेतलेल्यांसाठी मी कोविडची लस घेतली आहे असा एक सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला होता. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ . पुरूषोत्तम पाटील, डॉ. सुधीर आवटे, डॉ. मयूर बिदरकर आदीं शिवाय डॉ। नितीश गावडे, डॉ. अरूणा गावडे, डॉ. रमेश जाधवर, डॉ. शोभा पाटील यांनी ही समीकरण करून घेतले.
कोवीड लस ही पुर्णपञे सुरक्षीत आहे, शहरातील बहुतांशी डाॅक्टरांनी उत्स्फूर्तपणे सल टोचून घेतली असता कोणालाही कसलाच त्रास झाला नसून जनतेस आवाहन करण्यात येते की, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून आलेल्या आदेशानुसार लस टोचून घेऊन सुरक्षित रहावे.
डाॅ.जीवन वायदंडे
वैद्यकीय अधिक्षक
मध्य प्रदेशात शेतक-यांना प्रत्येकी मिळणार ४ हजार