उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील एका गावातील 20 वर्षीय लैंगिक अत्याचार करून त्याचे छायाचित्रण केले. तसेच ते छायाचित्रण इतरत्र प्रसारित केले. याप्रकरणी सहा तरूणाविरूद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी तालुक्यातील एका गावातील 20 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) ही 27 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गाईला पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेली होती. यावेळी गावातील एका तरूणाने तिला ऊसाच्या पिकात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच 28 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पहिल्या तरूणासह अन्य पाच तरूणांनी तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला. या दरम्यान त्यांच्यातील एका तरूणाने सदर घटनेचे मोबाईलवर छायाचित्रण करून प्रसारित केले. याप्रकरणी पीडित मुलीने वाशी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून संबंधित तरूणांविरूद्ध 29 डिसेंबर रोजी भादंसं कलम 376, 376 (ड), 506, 34 सह आयटीएसीटी कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.