22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबादनळदुर्गमध्ये जनता कर्फ्यूला केराची टोपली

नळदुर्गमध्ये जनता कर्फ्यूला केराची टोपली

एकमत ऑनलाईन

नळदुर्ग : जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने कोरोना रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दर रविवारी संपूर्ण जिल्ह्यात एक दिवसाचे जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. मात्र नळदुर्ग शहरातील काही व्यापा-यांनीच प्रतिसाद दाखवला. अनेकांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत चक्क आपली दुकाने चालू ठेवली. त्यामळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे रविवारी (दि.१३) पहावयास मिळाले.

शहरवासीयांनी स्वतःला घरातच लॉकडाऊन करून घेणे गरजेचे असताना चक्क रस्त्यावर ठीक ठिकाणी घोळके करून गप्पा मारत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की नळदुर्ग शहरातील लोकांनी कोरोना सारख्या महाभयानक आजाराला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. विशेष म्हणजे हा प्रकार केवळ जनता कर्फ्यूच्या दिवशी घडतो असा नाही तर दररोज तीच परिस्थिती आहे कारण शहरातील काही दुकानदार प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतर सुद्धा आपली दुकाने चालू ठेवत आहेत.

विशेष म्हणजे चार दिवसापूर्वी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे , नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यांनी वेळ संपल्यानंतर दुकाने चालू ठेवणारे व प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन न करणा-या दुकानदारा विरोधात विशेष मोहीम उघडून कारवाई केली होती. व यापुढे असाच काही प्रकार घडला तर दुकाने सील करू अशी तंबी देखील त्यावेळेस देण्यात आली होती. मात्र असे असतानासुद्धा जनता कर्फ्यूच्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहरातील काही दुकानदार चक्क प्रशासनाला आव्हान देत आपली दुकाने चालू ठेवल्याने जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

जनता कर्फ्यू संदर्भात जिल्हा व स्थानिक प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन करीत शहरवासीयांनी सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचा आपला मोह टाळून स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोरोनाच्या संसर्गापासून वाचवावे जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी केले होते. मात्र शहरात काही व्यापारी याच्या विपरीत वागत असल्याने आता प्रशासनाने कठोर पावले उचलत प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन न करणा-या लोकांविरोधात विशेष मोहीम उघडून कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा येणाèया काळात कोरोनाचा उद्रेक नळदुर्ग शहरात होईल.

डावपेचांमध्ये भारताची पहिल्यांदाच चीनवर मात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या