23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादरस्त्यावर बैल बांधण्याच्या कारणावरून भावाने भावाचे दात पाडले

रस्त्यावर बैल बांधण्याच्या कारणावरून भावाने भावाचे दात पाडले

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : रस्त्यावर बैल बांधल्याच्या कारणावरून सख्या भावाने भावाचे दात पाडले. भावाच्या पत्नीचा चावा घेवून जखमी केले. ही घटना दहिफळ ता. कळंब येथे १६ जुलै रोजी सायंखाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील दहिफळ येथील रमेश आश्रुबा भातलवंडे हे १६ जुलै रोजी आपल्या पत्नीसह दहिफळ गट क्र. १३ मधील शेतात होते. यावेळी त्यांचा भाऊ श्रीहरी आश्रुबा भातलवंडे व भावजय रतन भातलवंडे यांनी तेथे जावून रस्त्यावर बैल बांधण्याच्या कारणावरुन रमेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली.

तसेच श्रीहरी भातलवंडे यांनी भाऊ रमेश भातलवंडे यांच्या तोंडावर दगड मारल्याने रमेश यांचे दोन दात पडून ते गंभीर जखमी जखमी झाले. रमेश यांच्या पत्नीस चावा घेवून त्यांनाही जखमी केले. या प्रकरणी रमेश भातलवंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीहरी भातलवंडे व रतन भातलवंडे या पती-पत्नी विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात १६ जुलै रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या