23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeउस्मानाबादउमरगा येथील तरूणाच्या खून प्रकरणी दोघांवर गुन्हा

उमरगा येथील तरूणाच्या खून प्रकरणी दोघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : हालशी हत्तरगा ता. निलंगा येथील अजित पाटील याच्या खून प्रकरणातील काही संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. उमरगा पोलीसांनी 12 ऑगस्ट रोजी संशयित दोघावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी सांगितले की, उमरगा येथील काळे प्लॉट परिसरात 11 ऑगस्ट रोजी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत तरूणाची ओळख पटू नये म्हणून त्याचे तोंड दगडाने ठेचण्यात आले होते. पोलिसांना मयताची ओळख पटविण्यात काही वेळाने यश आले होते. हालशी हत्तरगा ता. निलंगा येथील रहिवाशी अजित वामनराव पाटील (वय 32) यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांसमोर मारेकर्‍यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले होते. तपासामध्ये पोलीसांना काही मारेकर्‍याची नावे निष्पन्न झाली होती. त्यावरून पोलीसांनी अंबादास मलगिरे व यासीन शेख (रा. काळे प्लॉट, उमरगा) या दोघांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मयत अजित पाटील यांची उमरगा ही सासूरवाडी आहे. ते काही दिवसापासून उमरगा येथे रहात होते. अजित पाटील यांना अंबादास मलगिरे व यासीन शेख या दोघांनी मद्य पाजून उमरगा येथील भारत विद्यालय येथे नेले. ते दोघे व अजित यांच्यात वाद झाल्यानंतर त्या दोघांनी अजित यांच्या चेहर्‍यावर दगडाने मारहाण करुन खून केला. या प्रकरणी मयत अजित पाटील यांचे चुलत सासरे रामचंद्र वरवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबादास मलगिरे व यासीन शेख या दोघांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या