22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादकानेगाव येथे जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍या ५० जणांवर गुन्हा दाखल

कानेगाव येथे जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍या ५० जणांवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

लोहारा : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ४० ते ५० जणांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानेगाव येथे समाज मंदीरासंबंधी दोन गटांत वाद असल्याने उपविभागीय दंडाधिकारी,उमरगा यांच्या आदेशाने त्या समाज मंदीराच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे समाज मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. असे असतानाही कानेगाव येथील श्रीकांत कदम यांच्यासह इतर ४० ते ५० लोकांनी दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या समाज मंदीराच्या १०० मीटर परिसरात जमून घोषणाबाजी करुन भा.दं.सं. कलम- १४३, १४५, १४७, १४९, १८८, ३४१ चे जाणीवपुर्वक उल्लंघन केले. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सदाशिव पांचाळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन ४० ते ५० जणांच्या विरोधात ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या