27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeउस्मानाबादतुळजापूर तालुक्यातील हिप्परगा ताड येथील सावकारावर गुन्हा दाखल

तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा ताड येथील सावकारावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : अवैध सावकारी करून लोकांच्या जमिनी बळकावणार्‍या तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा (ताड) येथील सावकारावर नळदुर्ग पोलिस ठाण्यात १८ ऑगस्ट रोजी सहकार अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानूदास दळवे असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा (ताड) येथील भानुदास दळवे हे अवैध सावकारी करत असल्याची तक्रार सहकार विभागाकडे दाखल झाली होती.

या तक्रारीची चौकशी केल्यानंतर ते अवैध सावकारी करत असल्याचे स्पष्ट झाले होते. भानूदास दळवे हे लोकांना व्याजाने पैसे देत असत, त्या मोबदल्यात आपल्याकडे शेतजमीनी तारण ठेवून तसेच काही वेळा जमीनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर करुन मगच समोरच्यास कर्ज देत असत. एकंदरीत ते सावकारी करत असल्याचे सकृत दर्शनी दिसून आले. या प्रकरणी तुळजापूर येथील सहकार अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भानूदास दळवे यांच्या विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसानंतर सावकारावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकर्‍यांच समाधान व्यक्त होत आहे. तर सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या