27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत बांधकाम परवाना न घेता घर बांधले, गुन्हा दाखल

उस्मानाबादेत बांधकाम परवाना न घेता घर बांधले, गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शहर असो वा ग्रामीण भाग, घराचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवाना घेणे कायद्याने बंधनकारक असते. परंतू अनेकजण बांधकाम परवाना न घेताच घराचे बांधकाम करतात. याकडे ग्रामपंचायत असो वा नगर परिषद आजपर्यंत दुर्लक्ष करीत आलेली आहे. त्यामुळे अनेकांनी परवाने न घेताच घराची बांधकामे केली आहेत. मात्र उस्मानाबाद शहरात बांधकाम परवाना न घेता घर बांधल्याप्रकरणी नगर परिषदेने एकावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. परवाना न घेता घर बांधणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील शांतीनिकेतन सोसायटीमध्ये दगडू सुर्यवंशी यांनी घर क्र. ३१/९५७ मध्ये नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय अनधिकृत बांधकाम केले आहे. या बाबत नगर परिषदेकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी नगर परिषदेचे स्वच्छता निरिक्षक सुनिल कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून दगडू सुर्यवंशी यांच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या