धाराशिव : प्रतिनिधी
अज्ञान वाहनाने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत लाखनगाव ता. वाशी येथील एका ७२ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात २२ फेब्रुवारी रोजी पारगाव बायपास रस्त्यावर घडला. या प्रकरणी मयताचा मुलगा सचेंद्र भागवत रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखनगाव ता. वाशी येथील भागवत बापुराव रसाळ (वय ७२) वर्षे हे दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पारगाव बायपास रस्त्यावरून मोटरसायकल क्र. एमएच २५ एस ०६८२ वर बसून जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे निष्काळजीपणे चालवून भागवत रसाळ यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.
या अपघातात भागवत हे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी मयताचा मुलगा-सचेंद्र भागवत रसाळ यांनी दि. ५ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- २७९, ३०४ (अ), सह मो.वा.का. कलम-१३४ (अ) (ब) १८४ अंतर्गत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.