29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeउस्मानाबादतुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

तुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

एकमत ऑनलाईन

सलगरा दिवटी : तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील युवक किरण चंद्रकांत बंडगर (२०) याचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. सलगरा येथील काही युवक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरला पायी जात होते. त्यावेळी गंधोरा पाटीजवळ हा अपघात झाला. सलगरा दिवटी येथील काही युवक तुळजापूर दर्शनासाठी पायी चालत जात होते. गंधोरा पाटीजवळ एका अज्ञात वाहकाने धडक दिल्याने किरण बंडगर याचा जागीच मृत्यू झाला.

धडक बसताच त्याच्या नाकातून व तोंडातून रक्त येऊ लागले. काही वेळातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सलगरा दिवटी परिसरात शोककळा पसरली आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे पायी जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष करून भाविक रात्रीच्या वेळी पायी प्रवास करतात. रात्रीच्यावेळी अपघात होवून पायी जाणार्‍यांचे मृत्यू होताना दिसत आहे. नागरिकांनी दर्शनासाठी पायी जात असताना दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या