29.6 C
Latur
Friday, January 22, 2021
Home उस्मानाबाद कळंब च्या कू. पौर्णिमा मोहिते यांची चित्रातून वेगळी ओळख

कळंब च्या कू. पौर्णिमा मोहिते यांची चित्रातून वेगळी ओळख

एकमत ऑनलाईन

सतीश टोणगे कळंब : जन्म त प्रत्येकाला काही ना काही तरी छंद, असतो तो फक्त जोपासायचा का नाही हे ज्यानी- त्यानी ठरवायचे असते, कोणतीही कला कालांतराने जीवन जगण्याचे साधन बनते. चित्रकला ही एक अशीच कला आहे. आडव्यातिरक्या रेषा ने बनवलेले चित्र जेव्हा  हुबेहूब वाटते तेव्हा त्या चित्रकाराचे कौतुक करावेसे वाटते, अशीच एक उदयोन्मुख  चित्रकार उदयास येऊ लागली आहे. कळंब येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले कै. नितीन विजयकुमार मोहिते यांची कन्या कू. पौर्णिमा नितीन मोहिते हिने चित्रकला या विषयावर वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

कै. नितीन विजयकुमार मोहिते हे अष्टपैलू व्यक्तिमत्व, क्रीडा क्षेत्रात नावाजलेले नाव या भागाचे पहिले आमदार कै. देवदत्तजी मोहिते यांचे ते नातू होते. त्यांचीच कू.पौर्णिमा ही मुलगी लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले पण परिस्थितीशी दोन हात करत तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले लहानपणी आडव्या, उभ्या  रेषा बनवून तयार केलेले चित्र तिला मनस्वी आनंद द्यायचे आणि याच क्षेत्रात तिने करिअर करायचे ठरवले आणि ती कौतुकास पात्र ठरू लागली आहे.

तिने अनेक चित्रे रेखाटली त्यामध्ये नाशिक येथील कुंभमेळ्यातील साधू तिने पाहिला आणि त्यांचे चित्र रेखाटण्याचा मोह तिला आवरला नाही गुंडाळलेली लांबसडक दाढी, उजळलेला चेहरा, कपाळवर भाळलेला मोठा मळवट, गळा भरून रुद्राक्षाच्या माळा असे साधू चे रुप तिने रेखाटले आणि हजारो जणांना ते आवडले ही.पौर्णिमा अभिनव महाविद्यालय पुणे येथे शिक्षण घेत आहे,ममता राठोड यांनी मला या क्षे त्रात येण्यासाठी प्रोत्साहित केले तर वडिलांचे निधन झाल्यानंतर मामा राहुल पडवळ यांनी सर्वोतोपरी मदत केली .त्यांच्या मुळेच मला आवडी चे क्षेत्र मिळाल्यचे पौर्णिमा ने सांगितले.

खरचं असे म्हणतात की आठवण ही अशी गोष्ट आहे की, जी भूतकाळात घेऊन जाते पण माझे वडील कै. नितीन मोहिते यांच्या आठवणी मात्र आज ही ताज्या आहेत, तिने रेखाटलेले वडिलांचे चित्र, कळंबकराना त्यांच्या कर्तुत्वाची नव्याने ओळख करून देत आहे. कू. पौर्णिमा नितीन मोहिते हिने शेकडो चित्रे रेखाटली असून, ती चित्रे  जिवंत वाटावीत यासाठी खूप मेहनत घेऊन त्यात जीव ओतला आहे.

एकदाचा घोळ संपला!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या