22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeउस्मानाबादउमरगा तालुक्यातील कडदोरा येथील शेतकरी पिता पुत्राचा विद्युत धक्क्याने मृत्यु

उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील शेतकरी पिता पुत्राचा विद्युत धक्क्याने मृत्यु

एकमत ऑनलाईन

कडदोरा : काशिनाथ रणखांब यांची कडदोरा येथे 12 एकर शेतजमीन आहे.त्यांच्या शेतात एक कुपनलिका तसेच एक सिंचन विहिर आहे.त्यासाठी लागणार्या विद्युत कनेक्शन साठी त्यानी महावितरन कडे डिमांड ही भरले आहे त्याचे काम सुरु असुन त्यासाठी वीजचे पोल खडी करण्यात आलेले असुन अद्याप तारा ओढल्या गेल्या नाहीत परिणामी त्या शेतकर्यानी आपले पीके जगवण्यासाठी जमिनीवरुन चारशे ते पाचशे फुट वायर टाकुन विद्युत प्रवाह घेतला होता.

काशिनाथ बाबू रणखांब हे मुलगा भीमसेन उर्फ अमोल काशिनाथ रणखांब , सचिन काशिनाथ रणखांब ,संतोष विनायक रणखांब यांच्यासह चौघे मंगळवारी शेतीची लाईट बंद असल्याने दांड्या रोवून वायर त्यावरुन घेत होते . त्यात ११ के.व्ही गावठाण विद्युत लाईनला वायर सोबत असलेले जीवाय तारचा स्पर्श झाल्याने काशिनाथ बाबू रणखांब वय 53 व भीमसेन उर्फ अमोल काशिनाथ रणखांब वय 25 या पिता पुत्राचा विद्युत प्रवाहाच्या धक्य्याने जागेवरच मृत्यु झाला तर सचिन विनायक रणखांब हा जखमी झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फुलपाखरांची बाग’ निर्माण करणारे उरणमधील तरूण पर्यावरणवादी कार्यकर्ते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या