धाराशिव : कळंब तालुक्यातील शिराढोण शिवारात कर्तव्य बजावत असलेल्या वन विभागाच्या कर्मचा-याला लाकडाची वाहतूक करणा-या लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी घडली. या प्रकरणी वन कर्मचारी धम्मसागर हरिभाऊ कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराढोण ता. कळंब येथील वन कर्मचारी धम्मसागर हरीभऊ कांबळे हे दि.१४ मार्च रोजी दुपारी १.२०वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी पाटीचे अलिकडे व राजेश मुदंडा यांचे शेताजवळ शासकिय कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एका लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरची थांबवून विचारपूस करत होते.
त्यावेळी शिराढोण येथील अज्जु शेख, अहमद शेख यांनी धम्मसागर कांबळे यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन, वाद घालून शिवीगाळ करुन मारहाण केली. शासकिय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वनरक्षक धम्मसागर कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन
पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.