28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeउस्मानाबादधनादेश अनादर प्रकरणी येरमाळा येथील एकाला सहा महिने कारावास

धनादेश अनादर प्रकरणी येरमाळा येथील एकाला सहा महिने कारावास

एकमत ऑनलाईन

वाशी : धनादेश अनादर प्रकरणी येथील न्यायालयाने एकास १ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई व सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. बांधकाम वीट विकत घेतल्या मोबदल्यात वीटभट्टी चालकास ९० हजाराचा धनादेश देण्यात आला होता. त्याचा अनादर केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याबाबतचे वृत्त असे की बावी ता. वाशी येथील वीटभट्टी चालक जयराम दत्तू कवडे यांच्या कडून येरमाळा ता. कळंब येथील अजीज अब्दुल मुलानी यांनी बांधकामासाठी विटा विकत घेतल्या होत्या. त्याबदल्यात पैसे नसल्यामुळे त्याने ९० हजार रुपयाचा धनादेश वीटभट्टी चालक कवडे यास दिला होता. कवडे यांनी हा धनादेश बँकेत वटवला असता तो धनादेश वटला नाही. धनादेशाचा अवमान झाल्यामुळे कवडे यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.

या बाबतीत वाशी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. अनेक दिवस हे प्रकरण न्यायालयात आरोपी ऑफिस यादी यांच्या बाजूने त्यांच्या वकिलाने आपले म्हणणेही दाखल केले. सर्व बाजू ऐकल्यानंतर व साक्षीपुरावे समोर आल्यानंतर येथील न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. कोळेकर यांनी अजीज बाबूलाल मुलांनी यास दोषी ठरवत २१ जुलै २०२० रोजी निकाल दिला.त्यांनी आपल्या निकालात १ लाख ८०हजार रुपये नुकसान भरपाई व सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
फिर्यादी कवडे यांच्यावतीने न्यायालयात अ‍ॅड. सुजित ढेपे व सुयोग पाटील यांनी बाजू मांडली.

Read More  पादुका या शॉर्ट फिल्मचे पोस्टर प्रदर्शित

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या