21.3 C
Latur
Wednesday, October 28, 2020
Home उस्मानाबाद भोसले हायस्कूलमध्ये तयार होतोय नीटचा उस्मानाबाद पॅटर्न

भोसले हायस्कूलमध्ये तयार होतोय नीटचा उस्मानाबाद पॅटर्न

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील शिक्षण क्षेत्रात नावलौकीक असलेल्या श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्याथ्र्यांनी सप्टेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात नीट परिक्षेच्या तयारीसाठी खास फोटॉन बॅच सुरू असून विद्यार्थ्यांना दिल्ली व कोटा (राजस्थान) येथील तज्ञ प्राध्यापकाकडून शिकविले जात असल्याने हे यश मिळाल्याचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी सांगितले.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचा नीट परिक्षेच्या तयारीसाठी खास फोटॉन बॅच सुरू आहे. या बॅचला शिकविण्यासाठी दिल्ली, कोटा (राजस्थान) येथील तज्ञ प्राध्यापक वृंद यांची संस्थेने नेमणूक केली आहे. मागील दोन वर्षापासून केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. या फोटॉन बॅच मधील दोन विद्यार्थी शासकीय वैद्यकीय (एमबीबीएस) प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये उंबरे अमर युवराज (७२० पैकी ५७० गुण), गाढवे श्रेयश रामा (७२० पैकी ५६७ गुण) मिळवून हे दोघे विद्यालयातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी बीडीएस, बीएएमएस व इतर शाखेच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते पात्र ठरलेल्या सर्व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार त्यांच्या पालकासह सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.

यावेळी बोलताना सुधीर पाटील म्हणाले की, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून उस्मानाबाद पॅटर्न तयार करण्याच्या उद्देशाने हे पहिले यशस्वी पाऊल आहे. त्याचे विशेष कारण असे की वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्याथ्र्यांनी कोणताही खाजगी क्लास लावलेला नव्हता. विद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांनी व विद्याथ्र्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. येत्या काळात उस्मानाबाद पॅटर्न च्या यशाचा हा आलेख वाढतच राहील.

उस्मानाबाद जिल्ह्यातील दहावीमध्ये ९८ टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी लातूर येथील नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. तेथील कॉलेजची लाखो रुपयांची फिस, खाजगी क्लासला असलेली लाखो रुपयांची फिस मध्यमवर्गीय पालकांना न परवडणारी आहे. याचा विचार करून भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात खास फोटॉन बॅच सुरू करण्यात आली आहे. या बॅचला दिल्ली व कोटा (राजस्थान) येथील तज्ञ प्राध्यापक शिकविण्याचे काम करीत आहेत. विद्याथ्र्यांकडून केवळ ३० हजार रुपये वार्षिक फिस घेऊन दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ असा १२ तास विद्यार्थी शाळेत असतो. त्याला खाजगी क्लास लावण्याची गरज नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. सध्या कोरोना काळात मार्च पासून पहिली ते १२ वीच्या सर्व विद्याथ्र्यांना दर्जेदार ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.

यावेळी प्राचार्य साहेबराव देशमुख, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, उपप्राचार्य प्रा. संतोष घार्गे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी हाजगुडे, प्रा. नंदकुमार नन्नवरे, फोटॉन प्रमुख प्रा. अरविंद भगत, तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य देशमुख यांनी केले. प्रा. सुर्यकांत कापसे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. भगत यांनी आभार मानले.

काश्मिरी नेत्यांचा समूह केवळ देखावा – भाजप नेते राम माधव यांची टीका

ताज्या बातम्या

पाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव – काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय संकटात अडकलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शांतता प्रस्तावात इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला...

दिल्ली विद्यापीठ कुलगुरूंचे निलंबन

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यांवरुन वाद सुरू...

अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकºयांवर...

पाक नकाशातून पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान वगळले

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवले आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती...

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवासासह...

काश्मिरात तिरंगा फडकू न देणे राष्ट्रद्रोह

नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार...

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४००...

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

लंडन : कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील...

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

नादेड : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे.मागील चोवीस तासात एकाचाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.यामुळे नांदेडाला तुर्त मिळाला आहे....

आणखीन बातम्या

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

नळदुर्ग येथे निघाला मनसेचा भव्य महिला मोर्चा

नळदुर्ग : महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने, प्रदेश सरचिटणीस तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली दि.२७...

महसूलचे अधिकारी-कर्मचारी जाणार सामुहिक रजेवर

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील महसूल यंत्रणा आगामी ५ दिवस ठप्प राहणार असल्याने अतिवृष्टीने शेतक-यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. विभागीय...

गटशिक्षणाधिकारी कुंभार यांनी राबवला सुसंवाद नवदुर्गां उपक्रम

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्याच्या गटशिक्षण कार्यालयात गटशिक्षण अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या रोहीणी कुंभार यांनी नवरात्र महोत्सव काळात सुसंवाद नवदुर्गांशी हा एक अभिनव शैक्षणिक...

मांजरा धरण शंभर टक्के भरले, ग्रीन बेल्ट सुखावला

लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेले केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाची पाणी पातळी दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता...

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

तुळजापूर : संबळाच्या कडकडाटात, आई राजा उदो उदोच्या गगनभेदी गजरात, कुंकवाची उधळण करत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे विजयादशमीचे सिमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यादिवशी...

वैद्यकीय अधिकाऱ्या अभावी पारगाव चे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे पारगाव परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वारंवार गैरहजर राहणाऱ्या...

सास्तूर येथील अत्याचार झालेल्या पीडित मुलींसाठी निषेध मोर्चा !

लोहारा (अब्बास शेख) : लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील अतंत्य गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर शासन करावे पीडित कुटूंबाला तात्काळ दहा लाख रुपये...

येणेगूरात दरोडा, ईट, लोहारा येथे घरफोडी, उस्मानाबादेत सोयाबीन पळवली तर बोरी येथे पादचाऱ्यास आडवून लुटले

ईट : भूम तालुक्यातील ईट येथील तंबाखू पानाचे व्यापारी शोकतअली तांबोळी यांच्या घरावर दसèयाच्या पूर्वसंध्येला अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. रविवारी (दि.२५) मध्यरात्री घरफोडी करुन...

हातातोडांशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा गहिवरला

उस्मानाबाद : जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले असून नदी, नाले, ओढे तुडूंब भरले आहेत. पाण्याच्या वाहत्या प्रवाहाबरोबर शेतक-यांनी पाहिलेली स्वप्न देखील...
1,324FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...