16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeउस्मानाबादपरंड्यात जनसागर उसळला

परंड्यात जनसागर उसळला

एकमत ऑनलाईन

परंडा : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील ५० टक्क्यांच्या आतील चौकटीत बसवून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी परंडा येथे मंगळवार दि. ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे तसेच आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी जोरदार घोषणाबाजी करीत सकल मराठा समाजाचा महामोर्चा शांततेत पार पडला. या मोर्चात महिला, तरुणींसह सकल मराठा समाजाचा जनसागर उसळला होता.
सोनारी रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मोर्चा सुरू झाला. हा मोर्चा पुढे नाथ चौक, संत सेना महाराज चौक, महाराणा प्रतापसिंह चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून कोटला मैदानात पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मैदानावरील भव्य व्यासपीठावर सुरवातीला जिजाऊ वंदना घेण्यात आली.

त्यानंतर मराठा समाजातील आरती पाटील, सई पाटील, आक्षरा गोरे, राजलक्ष्मी पाटील व साक्षी कवडे या मुलीनी आक्रमक शब्दात मराठा समाजाची ऐतिहासिक भूमिका मांडून आरक्षणाची मागणी करत आरक्षण नाही तर मतदान नाही, अशा घोषणा देत शासनाला गंभीर इशारा दिला.

आरक्षण मागणीच्या या महामोर्चासाठी परंडा तालूक्यासह बार्शी, करमाळा, भुम, वाशी, कळंबसह उस्मानाबाद व माढा तालुक्यातील जवळपास एक लाखाच्या संख्येने सकल मराठा समाज सहभागी झालेला होता. सभेच्या समारोपानंतर व्यासपिठावर या सर्वांच्या उपस्थीतीत आरक्षण मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहीणी न-हे यांनी स्वीकारले,यावेळी तहसीलदार देवणीकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थीत होते. या सभेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी आरक्षण समन्वय समितीच्या वतीने तालुक्यातील ९६ गावांत बैठका घेण्यात आल्या होत्या. मोर्चासाठी आलेल्या समाज बांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी अथक परिश्रम घेण्यात आले.

महामोर्चात अल्पोपहार
महामोर्चात सहभागी झालेल्या सकल मराठा समाजासाठी मोर्चा मार्गावर भैरवनाथ शुगर वर्क्स व डिगंबर जगदाळे यांच्या वतीने अल्पोपहार, मिलन अँक्वा, सद्दीवाल कॉम्प्लेक्स, एस.टी.आगार, साईलीला पेट्रोलियम यांच्या वतीने थंड पाणी तसेच हॉटेल सोनाई व हॉटेल उपसरपंच यांच्यावतीने चहा, जामिअत उलमा ए ंिहद या संघटनेच्या वतीने शरबत तर छ. शिवाजी चौकात बिस्कीट व केळी चे वाटप करण्यात आले.

ओबीसीतून टिकाऊ आरक्षण द्या
मराठा समाजाला विदर्भ व खानदेशातील कुणबी मराठ्यांप्रमाणे ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आत टिकावू आरक्षण मिळावे. मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा मराठा, मराठा हे सर्व एकच असल्याने मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा. मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा व्याज परताव्यासाठी ५० लक्ष रुपये करण्यात यावी. मराठा समाजाला कुणबी समजण्याची अधिसूचना निर्गमित होईपर्यंत ५ एकर जमिनीची अट शिथील करून इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळवा. आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या सर्व मराठा पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करावी. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतीगृह जिल्हा व तालुका पातळीवर त्वरीत सुरु करण्यात यावेत, तसेच शेतक-यांच्या उन्नतीसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा. या सर्व मागण्यां निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या