बीबी दारफळ : येथील पुरुषोत्तम (उत्तम ) ननवरे यांचा मुलगा प्रणव पुरुषोत्तम ननवरे (वय अंदाजे ९ वर्ष) यांचे रविवार दिनांक १७ जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या शेतातील भिंत अंगावर कोसळून दुर्दैवी निधन झाले आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार रविवार सुट्टी असल्यामुळे वडीला सोबत शेताकडे गेलेले असताना चार पाचच्या दरम्यान थोडाफार पाऊस आल्यामुळे शेतात असलेल्या पत्र्याच्या खोलीच्या कोप-याला विसाव्यासाठी वडिलांसोबत थांबलेले असताना पावसाची आणि वा-याच्या दबावाने भिंतीचा कोपरा अंगावर पडल्याने उपचारासाठी छत्रपती सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे नेले असता मयत घोषित करण्यात आले. त्यामुळे पूर्ण नन्नवरे परीवारावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. पूर्ण गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.