31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeउस्मानाबादतुळजापूर तालुक्यातील नंदगावच्या महिलेचा अपघातात मृत्यू

तुळजापूर तालुक्यातील नंदगावच्या महिलेचा अपघातात मृत्यू

एकमत ऑनलाईन

धाराशिव : जळकोट ते तुळजापूर जाणा-या रस्त्यावर पायी जात असलेल्या ७० वर्षीय महिलेला कारने जोराची धडक दिली. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २६ मार्च रोजी घडली असून या प्रकरणी कार चालकाच्या विरोधात २८ मार्च रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदगाव, ता. तुळजापूर येथील शालाबाई काशिनाथ चौगुले, वय ७० वर्षे, ह्या दि. २६ मार्च रोजी सायंकाळी जळकोट ते तुळजापूर रोडवर नंदगाव मोड येथे रस्त्याने पायी जात होत्या. दरम्यान स्विफ्ट डिझायर कार क्रं एमएच १२ क्युजी ९२०१ चा चालक जगन्नाथ मारुती बालकुंदे रा. रिकटवाडी हवेली, खडकवासला पुणे यांनी त्यांच्या ताब्यातील कार ही भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवल्याने शालाबाई यांना साईडने धडक दिली.

या अपघातात शालाबाई ह्या गंभीर जखमी होवून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचा मुलगा चितानंद काशीनाथ चौगुले यांनी दि.२८ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- २७९ , ३३७ , ३०४ (अ), सह मो. वा. कायदा कलम १८४ अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या