24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादजुन्या वादातून महिलेवर कोयत्याने वार

जुन्या वादातून महिलेवर कोयत्याने वार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जुन्या वादातून एकाने महिलेवर कोयत्याने वार केला. यामध्ये महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, याबाबत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील कुसूम जाधव या त्यांची मुले पूजा व कृष्णा यांच्यासह 19 ऑगस्ट रोजी गावातील राजु सूर्यवंशी यांच्या दुकानासमोरील रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी राजु यांनी जुन्या वादाच्या कारणावरून कुसूम यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.

आपल्यावर वार होत असल्याचे लक्षात येताच कुसूम यांनी आपला डावा हात आडवा केला. यामध्ये कुसूम यांच्या हाताच्या मनगटाजवळ गंभीर जखम झाली. याप्रकरणी कुसूम जाधव यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान उमरगा पोलिसांना फिर्याद दिली. त्यावरून राजु आगजप्पा सूर्यवंशी (रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) याच्या विरूद्ध 21 ऑगस्ट रोजी कलम 326, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या