23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउस्मानाबादविजेचा शॉक लागून रुईभर येथील तरूणाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून रुईभर येथील तरूणाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तालुक्यातील रुईभर येथील तरूण तानाजी उर्फ बाळा सुभाष पवार (वय 30) याचा विजेचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री दि. 8 जून रोजी घडली आहे. गावातील एका तरूणाचा आकस्मात मृत्यू झाल्याने रुईभर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

रुईभर येथे बुधवारी रात्री वादळी र्वा­याने विज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर पुन्हा विज पुरवठा सुरू झाला. घरातील वीज सुरू झाली नसल्याने तानाजी पवार हा विजेचे काम करीत असताना त्याला जबर शॉक लागला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दि. 9 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तानाजीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तानाजी पवार याच्या पश्चात आई-वडील, एक मोठा भाऊ, बहीण, पत्नी, एक वर्ष वयाचा मुलगा असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या