21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादउमरगा शहरात डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

उमरगा शहरात डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

एकमत ऑनलाईन

उमरगा : उमरगा शहरातील काळे प्लॉट परिसरात गुरुवारी दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी एका ३० ते ३५ वयाच्या तरूणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. अजित वामन पाटील (रा. हलसी हत्तरगा ता. निलंगा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा शहरातील काळे प्लॉट परिसरात गुरुवारी दुपारी एका तरूणाचा दगडाने ठेचून चेहरा विद्रूप करण्यात आलेला मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते. श्वानपथकाला पाचारण केले होते. पावसामुळे श्वानपथक घुटमळल्याने आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. अजित पाटील हा निलंगा तालुक्यातील हलसी हत्तरगा येथील असून तो हल्ली उमरगा येथेच राहतो. मारेक-यांनी तरुणाची ओळख पटू नये, यासाठी त्याच्या डोक्यात व चेह-यावर दगड घालून त्याचा चेहरा विद्रूप केला होता. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मारेक-यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उमरगा पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या