22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeउस्मानाबादचिवरीत तरुणाचा तर सावळसूर येथे तरुणीचा खून करुन एकाची आत्महत्या

चिवरीत तरुणाचा तर सावळसूर येथे तरुणीचा खून करुन एकाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तुळजापूर व उमरगा तालुक्यात दोन घटनेत दोघांचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडल्या आहेत. तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारात शेतीच्या वादातून बुधवारी (दि.२१) दुपारी एकाचा खून झाला. तर उमरगा तालुक्यातील सावळसूर येथे ८ ऑक्टोबर रोजी तरुणीस मारहाण करुन गंभीर जखमी करुन एकाने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यानंतर गंभीर तरुणीवर सोलापूर येथे उपचारादरम्यान गुरुवारी (दि.१५) मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यात दोन खूनाच्या तर एकाची गळफास घेवून आत्महत्या केल्याने बुधवारी (दि.२१) गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील येवती येथील लक्ष्मण मारुती येडगे (वय ३३) हे बुधवारी (दि. २१) त्यांचे मित्र धनाजी गवळी यांच्यासोबत धनाजी यांच्या चिवरी शिवारातील शेतात गेले होते. यावेळी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण येडगे यांचा भाऊ राम येडगे व त्याचा मेव्हणा हरीश सायप्पा माशाळे (रा. मदरे, ता. सोलापूर, दक्षिण) हे दोघे त्या ठिकाणी आले. राम येडगे याने भाऊ लक्ष्मण यास रस्त्यावर बोलावून घेतले. यावेळी पुर्वीच्या भांडणावरुन व शेतजमीन विक्री-मालकीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी व दगडाने शिरावर मारहाण करुन ठार मारले.

यावेळी लक्ष्मण याचा बचाव करण्याचा प्रयत्न करणाèया धनाजी विनायक गवळी यांना शिवीगाळ करुन, तु मध्ये आलास तर तुलाही जिवे ठार मारीन, असे धमकावले. याप्रकरणी धनाजी गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- ३०२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तर उमरगा तालुक्यातील सावळसूर येथील सोनाली कल्लेश्वर गायकवाड (वय २९) या ८ ऑक्टोबर रोजी दुपारी राहत्या घरी असताना अजय तानाजी आडगळे (रा. तळणी, ता. औसा) हा तेथे आला. जुना वाद उकरुन काढून अजय याने सोनाली यांना दगड-विटांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. यानंतर अजय याने त्याच घरात गळफास घेउन आत्महत्या केली. जखमी सोनाली यांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले. यावेळी सोनालीचा गुरुवारी (दि. १५) मृत्यू झाला. याप्रकरणी सदर गुन्ह्याची कागदपत्रे सदर सोलापूर येथील बाजार पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त झाल्याने मयत अजय याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- ३०२ अन्वये गुन्हा बुधवारी (दि. २१) नोंदवला आहे.

ब्रेस्ट कॅन्सर पेशींना नष्ट करण्याचे प्रयोगशाळेतील संशोधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या