तुळजापूर : शहरातील दहावीत शिकणार्या 15 वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला फुस लाऊन पळवून नेले. त्यानंतर सदर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुळजापूर शहरातील दहावी वर्गात शिकणारी 15 वर्षीय विद्यार्थिनी 23 डिसेंबर रोजी घरामधून निघून गेली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे भादवी 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अल्पवयीन मुलीचा 26 डिसेंबर रोजी शोध घेण्यास पोलिसांना यश आले. मुलीला लग्नाचे अमिष दाखवून अपहारण करून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली.
संबंधित मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचाराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे आरोपीच्या विरोधात भादवी कलम 363, 376 सह पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यातील आरोपीस पोलिसांनी अटक करून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक साहेबराव शिंदे करत आहेत.