24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउस्मानाबादमदतीचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मदतीचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : गावाकडे पायी चालत जात असलेल्या अल्पवयीन मुलीला एकाने मदत करण्याचा बहाणा करून तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. तीच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेत घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानाबाद जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) तीच्या मामाच्या गावी असताना तीच्या इच्छेविरुध्द घरच्या लोकांनी लग्न जमवले. त्यामुळे ती मामाच्या घरी कोणास काही न सांगता दि. २१ सप्टेंबर रोजी रोजी दुपारी तीच्या गावी जाण्यासाठी घराबाहेर पडली. दरम्यान ती तीच्या गावी चालत जात असताना रात्री १०.१० वाजण्याच्या सुमारास एका ४० वर्षीय व्यक्तीने तीला मदतीचा बहाना करुन तीला आपल्यासोबत एका निर्मनुष्य घरात घेवून गेला. तीच्यावर बळजबरीने लैंगीक अत्याचार केला. तसेच तीच्या जवळील सोन्याची अंगठी काढून घेतली. घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीचे अश्लील छायाचित्र प्रसारीत करण्याची तीला धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीने दि. २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३७६ (२) (एफ), ३७९, ५०६ सह पोक्सो कायदा कलम- ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या