23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादलग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : लग्नाचे आमिष दाखवून एका २६ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना १५ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून एका पुरूषाच्या विरोधात १६ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील एका २६ वर्षीय तरूणीला एकाने लग्नाचे आमिष दाखवून मागील एक वर्षापासून शारिरीक संबंध ठेवले. लग्नाबाबत तिने त्याला विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे तीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला असता त्याने तीला १५ जुलै रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास मारहाण करून तीच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून त्या व्यक्तीच्या विरोधात १६ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या