24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeउस्मानाबादतुळजाभवानीच्या खजिन्यावर डल्ला, आरोपी अटकेत

तुळजाभवानीच्या खजिन्यावर डल्ला, आरोपी अटकेत

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनांचे आराध्य दैवत असलेल्या श्री आई तुळजाभवानी मातेच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणा-या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला अखेर पोलिसांनी अटक केली असून आज तुळजापूर येथील न्यायालयासमोर त्याला हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

गुन्हा नोंद झाल्यापासून दिलीप नाईकवाडी तब्बल १ वर्ष फरार होता. मात्र अखेर त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. नाईकवाडी याने ३५ तोळे सोने, ७१ किलो चांदी व ७१ प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. नाईकवाडी याच्या १७ वर्षाच्या कालावधीत त्याने टप्प्याटप्प्याने पुरातन नाणी गायब केली. त्यामुळे या काळात त्याला कोण मदत करत होते? त्याचे साथीदार व सूत्रधार कोण? ही नाणी सध्या कुठे आहेत, यासह अन्य बाबी तपासात समोर येणार आहेत.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापकपदी कार्यरत असताना २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नाईकवाडी याने पदाचा दुरुपयोग करत श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याच्या ताब्यात असलेला श्री तुळजा भवानीदेवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच ७१ प्राचीन नाणी याचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. या फिर्यादीवरुन पोलिसांनी दिलीप नाईकवाडी याच्या विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली झाल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर १३ सप्टेंबर २०२० रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या