23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादमोहा येथील अनैतिक संबंध खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

मोहा येथील अनैतिक संबंध खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

२०१७ मध्ये झाला होता खून

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मोहा येथे अनैतिक संबंधातून एकाचा ६ सप्टेबर २०१७ मध्ये खून झाला होता. याप्रकरणी मोहा येथील आरोपी संजय दिलीपराव मडके यास उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून सोमवारी (दि. २७) जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी एकूण २० साक्षीदार तपासण्यात आले होते.

याबाबत माहिती अशी की, मोहा येथील संजय दिलीपराव मडके याच्या पत्नीबरोबर श्रीरंग शाहु भोयटे याचे अनैतिक संबंध होते. ६ सप्टेबर २०१७ रोजी श्रीरंग भोयटे व आरोपीची पत्नी यांच्यात मोबाईलवरुन भेटणेबाबत बोलणे झाले होते. याची माहिती संजय मडके यास झाली. त्यामुळे आरोपी संजय मडके व त्याचा विधीसंघर्ष बालक या दोघांनी यादिवशी श्रीरंग भोयटे यास मारण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपी संजय मडके याने श्रीरंग भोयटे यांच्या मोटारसायकलवर बसून त्याच्या शेतात नेले.

यावेळी भांडण करुन विधीसंघर्षग्रस्त बालकास मडके याने लोखंडी कत्ती आणण्यास सांगून या कत्तीने श्रीरंग भोयटे यांच्या मानेवर, हातावर वार करुन गंभीर जखमी केल्यामुळे भोयटे यांचा यात मृत्यू झाला होता. यावेळी पुरावा नष्ठ करण्यासाठी संजय मडके याने मयत श्रीरंग भोयटे याचे प्रेत व मोटारसायकल मोहा शिवारातील एका ऊसाच्या पिकात टाकले. तसेच मयताचा मोबाईल फोडून सिमकार्ड फेकून दिले होते.

याप्रकरणी मयताचे वडील शाहु भोयटे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यामुळे आरोपी संजय मडके याच्यावर १० सप्टेबर २०१७ रोजी भांदविचे कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी उस्मानाबाद येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर प्रकरणाची अतिरिक्त सत्र न्यायाधिश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सोमवारी (दि. २७) सुनावणी झाली. सदर प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने शासकीय अभियोक्ता शरद बी. जाधवर यांनी कामकाज पाहिले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे २० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा पुरावा व सदर प्रकरणात शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी संजय दिलीपराव मडके यास भांदविचे कलम ३०२ प्रमाणे दोषी धरुन न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना शिक्षा ठोठावली आहे.

Read More  ओल्या बाळंतीनीची रुग्णालयातुन हकालपट्टी

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या