22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeउस्मानाबादअतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ पूर्ण करून प्रस्ताव सादर करावेत...

अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ पूर्ण करून प्रस्ताव सादर करावेत -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे व माती खरडून गेल्याने शेत जमीनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीमुळे नुकसान बाबत चा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, माजी आमदार मधुकर चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड, जनावरांची हानी आणि रस्ते व पुलांचे नुकसानीबाबत चे पंचनामे त्वरित पूर्ण करावेत. अतिवृष्टीने व पुरामुळे शेतजमिनीचे ही नुकसान झालेले आहे जसे की माती वाहून जाणे त्यामुळे अशा ठिकाणी शेतकरी रब्बी पेरणी करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांनाही शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. या नैसर्गिक आपत्ती मध्ये शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून लवकर मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तर माजी मंत्र मधुकर चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या पीक, जनावरे, घरांची पडझड व जमीनी खरडून जाणे याची माहिती देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज असल्याचे सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मागील 5-6 दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात 200 तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 18 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेली व पुरामुळे आजच्या माहिती नुसार जवळपास 3 हजार हेक्टर जमिनीवरील माती खरडून गेल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यातील 223 बंधारा पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या दृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेले असून 84 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश तात्काळ दिले गेले असून आजपर्यंत 80 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे सुरू असून लवकरच पूर्ण होतील अशी माहिती त्यांनी दिली.

आजोळी आलेल्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या