28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeउस्मानाबादअगरबत्ती मशीन; ७ जणांची १४ लाखांनी फसवणूक

अगरबत्ती मशीन; ७ जणांची १४ लाखांनी फसवणूक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : अगरबत्ती बनविण्याचे मशीन व त्यासाठी लागणारा कच्चा माल देण्याचे देण्याचे आश्वासन देवून उस्मानाबाद येथील ७ जणांची १३ लाख ६० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दिघोळ (आंबा) ता. अंबाजोगाई येथील अजित राम मुळीक याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात २८ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघोळ (आंबा), ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील अजित राम मुळीक यांनी भिमनगर, उस्मानाबाद येथील लता मनोज शिंगाडे यांच्यासह त्यांचे ७ सहकारी यांना अगरबत्ती तयार करण्याच्या मशीन व त्यासाठी लागणारा कच्चा माल आणुन देतो असे आश्वासन दिले. त्यासाठी मुळीक यांनी दि. २४ सप्टेंबर ते दि. २५ रोजी दरम्यान लता शिंगाडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांकडून एकुण १३ लाख ६० हजार रूपये रक्कम घेतली. तसेच ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता अजित मुळीक यांनी जुन्या मशीन देवून लागणारा कच्चा मालही न देता लता लता शिंगाडे यांच्यासह त्यांच्या ७ सहकार्‍यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी लता शिंगाडे यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम-४२० अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या