तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबाकाका मंदिर व तेरचा म्हणवा तितका विकास झाला नाही. मंदिर परिसरात झालेली दुरवस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही, अशा शब्दांत खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपावासी झालेल्या आ. राणा जगजितसिंह पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. अजित पवार यांची तेर ही सासरवाडी आहे, त्यामुळे इथे विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तेर येथे श्री संत गोरोबाकांकाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मंदिराची पाहणी केली. तसेच त्यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. खा. सुळे म्हणाल्या, डॉ पद्मसिंह पाटील व शरद पवार यांचे ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. शरद पवार यांच्या चांगल्या-वाईट काळात डॉ. पाटील यांनी साथ दिली. ते मी आयुष्यभर विसरणार नाही.
तेर ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सासुरवाडी असल्याने नाते घट्ट आहे. तेर येथील संत गोरोबाकाका मंदिर व तेरचा म्हणवा तितका विकास झाला नाही, मंदिर परिसरात जी दुरावस्था झाली आहे. ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही, असे म्हणत भाजपावासी झालेल्या आ. पाटील यांना त्यांनी टोला लगावला. अजित पवारांच्या सासरवाडीत विकास झाला पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी आ.विक्रम काळे, माजी राहुल मोटे, राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, वैशाली मोटे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, धनेश्वरी शिक्षण समूहाचे प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, रमेश बारस्कर, रेवणसिद्ध लामतुरे प्रशासक सौदागर आदींची उपस्थिती होती.