31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादखैरी नदीपात्रात सापडलेला प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर

खैरी नदीपात्रात सापडलेला प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर

एकमत ऑनलाईन

परंडा : तालुक्यात डोंजा येथे खैरी नदीपात्रात ११ व्या शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले होते. संबंधीत विभागास याबाबत माहीती असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

खैरी नदीपात्रामध्ये सापडलेल्या या अवशेषा बाबतची पुर्ण माहिती ऐतिहासिक परंडा तालुक्याची पर्यटन मार्गदर्शिका तयार करणारे, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँण्ड कल्चरल हेरिटेज नवी दिल्लीचे अजीव सदस्य अजयकुमार माळी यांनी संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रालय संचलनालय मुंबई यांना याचे जतन व संरक्षण व्हावे, म्हणुन पत्र दिले होते.

औंरगाबाद पुरातत्व विभागाचे अधिकारी कर्मचारी,परंडा किल्ला प्रमुख ज्ञानेश्वर गावडे व सहकारी यांनी डोंजा येथे सदरील खैरी नदीपात्रात प्राचीन अवशेष सापडेल्या घटनास्थळाची पुर्ण पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. त्यानंतर तीन महिन्याचा काळ उलटुनही गेला आहे. पावसाळा सुरु झाला असुन खैरी नदीपाञात पाणीसाठा जमा होण्यास सुरुवात झाली असल्याने हा सापडलेला प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आता जर एखाद्या जोरदार पावसाने नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ झाल्यास सापडलेला ऐतिहासीक प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Read More

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या