25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeउस्मानाबादचॉकलेटच्या बहाण्याने अंगणवाडीतील बालिकेवर अत्याचार

चॉकलेटच्या बहाण्याने अंगणवाडीतील बालिकेवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका खेडेगावातील अंगणवाडीत शिकणार्‍या ४ वर्षीय मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने निर्मनुष्य पडक्या वाड्यात नेऊन १८ वर्षीय तरूणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना समजताच सर्वत्र संताप व्यक्त होत असून, याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.

सोमवारी लोहारा तालुक्यातील एका खेडेगावातील अंगणवाडीत शिकत असणार्‍या ४ वर्षीय मुलीला वर्गातून चॉकलेट देण्याच्या बहाण्याने १८ वर्षीय तरूणाने अंगणवाडीच्या बाहेर आणले. चॉकलेट देऊन सदर मुलीला निर्मनुष्य असणार्‍या पडक्या वाड्यात नेले. या ठिकाणी त्या तरूणाने मुलीवर अत्याचार केला. सदरील घडलेला प्रकार पीडित मुलीने घरी आल्यानंतर आईला सांगून वाडा दाखविला. सदरील अत्याचाराची घटना समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश नरवडे, पोलीस उपनिरिक्षक आनंदराव वाठोरे, उपनिरिक्षक अनुसया माने यांनी घडलेल्या घटना स्थळाला भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून 18 वर्षीय तरूणा विरोधात लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या