34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeउस्मानाबादटोमॅटो चे दर गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांने पिकात सोडली जनावरे

टोमॅटो चे दर गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांने पिकात सोडली जनावरे

एकमत ऑनलाईन

कळंब : चार महिन्यापुर्वी 60 ते 70 रुपये प्रति किलो दराने विक्री होणारे टोमॅटो सध्या कवडीमोल दराने विक्री होत आहेत, टोमॅटो ची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत, यामुळे मशागतीसह फवारणीचा खर्च, टॉमेटो बाजारात विक्रीला आणण्यासाठी वाहणाचे भाडे ही निघत नाही. अगोदरच अतिवृष्टीत होरपळलेल्या शेतकरी यामुळे संकटात सापडला आहे.

टोमॅटो ची आवक मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे टोमॅटोसह विविध भाजीपाला पिकवुन बाजारपेठेत आणत आहेत. मात्र सध्या आवक मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे टोमॅटोसह, पानकोबी, फुलकोबीचे भाव प्रचंड घसरले आहेत. वाहनाचे भाडे व तोडणीसाठी मजुरी देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो ची तोडणी बंद केली आहे. तसेच टोमॅटो शेतात सडत आहेत. परिणामी शेतात जनावरे सोडली आहेत.

मागील चार ते पाच महिन्यापुर्वी 70, ते 80 रूपये किलो दराने विक्री होणारे टोमॅटो सध्या कवडीमोल दराने विक्री होत आहेत . त्यामुळे टोमॅटो लागवडीसाठी होणारा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे पिकात जनावरे सोडून दिली आहेत. बालाजी इंगोले. टोमॅटो उत्पादक शेतकरी.

तुळजाभवानी मातेच्या दरबारात कोरोनाची भिती संपली अन् देवी दर्शनासाठी गर्दी सुटली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या