लोहारा : लोहारा नगर पंचायतच्या 17 प्रभागातील मतदान प्रकिया पार पडल्यानंतर आज 19 जानेवारी रोजी मत मोजणी पार पडली यात एकूण 17 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सेना राष्ट्रवादी आघाडीचे 11 तर काँग्रेस 4 तर अपक्ष 2 असे एकूण 17 उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये प्रभाग 16 मधील काँग्रेस पक्षाचे विकासरत्न आरीफ खानापूरे यांचा दणदणीत विजय झाला आहे.तर प्रभाग 3 मधील गौस मोमीन हे सेनेचे नवख्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना पसंती न देता साधा सरळ उमेदवार निवडला आहे.
निवडून आलेले 17 उमेदवार
——————————————-
प्रभाग एक मधील वैशाली खराडे आघाडी
प्रभाग दोन आरती गिरी अपक्ष
प्रभाग तीन गौस मोमीन आघाडी
प्रभाग चार प्रशांत काळे काँग्रेस
प्रभाग पाच अमीन सुंबेकर अपक्ष
प्रभाग सहा मयुरी बाबू आघाडी
प्रभाग सात कमल भरारे आघाडी
प्रभाग आठ सारिका बंगले आघाडी
प्रभाग नऊ संगीता किशोर पाटील काँगेस
प्रभाग दहा विजयकुमार ढगे काँग्रेस
प्रभाग अकरा सुमन दिपक रोडगे आघाडी
प्रभाग बारा जालिंदर कोकणे आघाडी
प्रभाग तेरा शमाबी आयुब आघाडी
प्रभाग चौदा शामल माळी आघाडी
प्रभाग पंधरा आयुब हबीब शेख आघाडी
प्रभाग सोळा आरिफ खानापूरे काँग्रेस
प्रभाग सतरा आरती ओम कोरे आघाडी
हे निवडून आलेले उमेदवार असून
लोहारा तहसील कार्यालयाच्या बाहेर निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष फटाक्याची अतिष बाजी मात्र मोठ्या उत्साहात दिसून येत होती.