27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeउस्मानाबादकळंबमध्ये रुग्ण संख्या वाढल्याने डॉक्टरांची तारेवरची कसरत

कळंबमध्ये रुग्ण संख्या वाढल्याने डॉक्टरांची तारेवरची कसरत

एकमत ऑनलाईन

कळंब : कळंब तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कळंब तालुक्यात आजवर कोरोना बाधितांची संख्या २९५९ वर पोहोचली तर २६१२ रूग्णानी कोरोणावर मात करून सुखरूप घरी गेले आहेत. तालुक्यामध्ये आजवर बाधितांची संख्या ही २९५९ वर पोहोचली आहे तर बरे होणे रुग्णांचे प्रमाण २६१२ आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी ३०५ रुग्ण हे वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर आजवर मरण पावल्याची संख्याही तालुक्यामध्ये ५० वर पोहोचली आहे.

शहरात सध्या उपजिल्हा रुग्णालय मध्ये १८ आयटीआय होस्टेलवर ८५ होम आयसोलेशन रुग्ण २०२ आहेत. असे एकूण २०२ रुग्ण उपचार व डॉक्टरांच्या निगराणीखाली सध्या आहेत. आजवर आरटीपीसीआर ७,६९० तपासण्या केल्या त्यापैकी प्राप्त अहवाल ७,६३० प्रलंबित अहवाल ६० आहेत. आजवर तपासणी पैकी निगेटिव आलेल्यांची संख्या ६,२५८ तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३७२ आहे. रॅपिडअँटीजन टेस्टमध्ये रुग्णांची संख्या १०,३०९ त्यापैकी निगेटिव रुग्णांची संख्या ८,६२० तर बाधित रुग्णांची संख्या १६८९ आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना व नर्स यांना उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी चालवुन शहराबाहेर असलेले कोरोना सेंटर चालवताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ही कसरत थांबवण्यासाठी कोविड सेंटरला नवीन डॉक्टरांची टीम तात्काळ नेमावी, अशी मागणी कर्मचा-यातून जोर धरत आहे. तर उपजिल्हा रुग्णालयात तर रोज जवळपास तीनशे ते चारशेच्या जवळपास ओपीडी रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातच गरोदर मातांची तपासणी, शस्त्रक्रिया, लसीकरण मोहीम, डिलीव्हरीसाठी रुग्ण दाखल होता. अशा अनेक रुग्ण वेगवेगळ्या उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होतात या सेवेसाठी डॉ. शोभा लोखंडे, डॉ. सुधीर आवटे, डॉ. निलेश भालेराव, डॉ. अपर्णा मुचाटे, डॉ. स्वप्नील qशदे, डॉ. शरद दशरथ, डॉ. भक्ती गीते, डॉ. योगिनी चौधरी, डॉ. मीरा कस्तुरे, डॉ. श्याम चौधरी, प्रगती भंडारे, सचिन ठाकूर आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कोरोना सेंटरमध्ये रूग्णाची सांख्या वाढत आहे. प्रत्येक नागरीकांनी मास्क वापरने जरूरीचे आहे. उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी प्रमाणात होत असल्याने दहा सिलेंडर जास्तीचे उपलब्ध करून द्यावेत. कोरोना रुग्णांचा औषधसाठाही कमी प्रमाणात शिल्लक आहे.
डॉ. जीवन वायदंडे
वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कळंब.

कोरोना प्रतिबंधक औषधी, ऑक्सीजन, रेमडिसिव्हरचा तुटवडा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या