29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeउस्मानाबादथोरलीवाडी येथील वयोवृद्ध शेतकऱ्याचा घातपात?

थोरलीवाडी येथील वयोवृद्ध शेतकऱ्याचा घातपात?

एकमत ऑनलाईन

उमरगा : उमरगा तालुक्यातील थोरलीवाडी गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेतातील विहिरीत बुधवारी (दि.७) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र रात्री उशीरापर्यंत तो शोधण्यात अपयश आले. दुसऱ्या दिवशी तो मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले. याच विहिरीत शेतकऱ्याची गाय व म्हशीला पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे ग्रामस्थामध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी (दि.७) नेहमी प्रमाणे घरच्या जनावरांना घेऊन शेताला गेलेले वडील तुकाराम भीमा खवडे सायंकाळी परतलेच नाही म्हणून, मुलगा व्यंकट तुकाराम खवडे हा शेताकडे शोध घेण्यास सुरुवात केली. तेंव्हा शेतातील विहिरीत गाय आणि म्हैस दोन्ही जनावरांचे पाय, बांधलेल्या अवस्थेत दिसून आल्याने आरडा ओरडा करून गावकèयांना एकत्र केले. सर्व प्रथम गाय व म्हशीला पाण्यातून बाहेर काढून त्यांचे बांधलेले पाय मोकळे केले. पण वडील काही दिसून आले नाहीत. परंतू त्यांच्या चपला त्याच विहिरीच्या बाहेरील बाजूने दोन बाजूला टाकलेले व्यंकट याना आढळून आले.

व्यंकट खवडे यांनी आपले बंधु उमाजी तुकाराम खवडे व अशोक खवडे यांना याबाबत दुरध्वनीद्वारे कळविले. खवडे उमाजी यांनी रात्री लागलीच उमरगा पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांची भेट घेऊन सदर लेखाजोखा कळविला. तेंव्हा रात्री १० वाजेपर्यंत अंधारात मयत तुकाराम भीमा खवडे यांचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी (दि.८) उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, सहायक पोलिस निरीक्षक गोरे व पोलीस कर्मचाऱ्याचा ताफा गावात दाखल झाला. पाण्याने भरलेल्या विहिरीत गळ टाकून शोध मोहीम चालू झाली.

पोलीस प्रशासनाच्या तासाभराच्या प्रयत्नाला अखेर यश आले आणि पाण्यातून मयत शेतकरी तुकाराम खवडे यांचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान ग्रामस्थांतुन आक्रोश व्यक्त होत होता. तर मयत तुकाराम हे एक उत्तम पोहनी खेळणारा व्यक्ती असल्याचे गावकर्यांनी सांगितले त्यामुळे हे एक नियोजित हत्याच आहे, असा आरोप पोलिसांसमोर मयताचे कुटुंबिय तथा गावक-यांनी करताना दिसून आले.

थोरलीवाडी गावात गेल्या काही महिन्यांपासून दोन गटात वादविवाद तथा तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे येथील गावकèयांनी सांगितले. पण मिडीयासमोर बोलण्यास नकार दिला. यावरून, गावात एक भीतीचे वातावरण असल्याचे समजते. या गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित राखण्यासाठी उमरगा पोलिस प्रशासनासमोर एक आव्हान ठरणार आहे. मयत शेतकरी तुकाराम खवडे यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून मयताचे कुटुंबिय उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे प्रांगणात जमा झालेले दिसून आले. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशीरापर्यन्त सुरू होती.

 

विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास दिले जीवदान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या