22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादपत्नीवर धारदार शस्त्राने वार; पतीविरूद्ध गुन्हा

पत्नीवर धारदार शस्त्राने वार; पतीविरूद्ध गुन्हा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कौटूंबिक कारणावरून पतीने पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार केले. याप्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शशिकांत झुरळे व सुषमा झुरळे हे पती-पत्नी राहतात. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी शशिकांत झुरळे याने कौटूंबिक कारणावरून आपली पत्नी सुषमा झुरळे या घरात झोपलेल्या असताना सुषमा यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कात्रीने पोटात, मानेवर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सुषमा झुरळे यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शशिकांत झुरळे याच्या विरूद्ध २१ ऑगस्ट रोजी भादंसं कलम ३०७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या