32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeउस्मानाबादतुळजाभवानी मातेच्या दरबारात कोरोनाची भिती संपली अन् देवी दर्शनासाठी गर्दी सुटली

तुळजाभवानी मातेच्या दरबारात कोरोनाची भिती संपली अन् देवी दर्शनासाठी गर्दी सुटली

एकमत ऑनलाईन

तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंगळवारी, शुक्रवार, रविवार रोजी तीन्ही वारा दिवसी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. तीर्थ क्षेत्र तुळजापूर मध्ये मंगळवार या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यानी भाविकांचे दर्शन व्यवस्थित होईल यासाठी मंदिर संस्थाने फ्रिपास २०,००० व्यवस्था केली आहे. तर भाविकांचे व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी भाविकांची गर्दी पाहता सध्या ३०,००० फ्रि पास ची व्यवस्था करण्यात आली आहे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच ३०० रुपये पेड पास होता तो २०० रु करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांची हेळसांड होणार नाही.

तरीही काही भाविक शहाजीराजे महाद्वार पासुनच दर्शन घेऊन परततात त्यात मंगळवार असल्यामुळे भाविकांची अलोट गर्दी होती यात काही भाविकांनी दर्शन केले तर काही भाविकांनी फ्री पास घेऊन दर्शन केले ज्यांना फ्री पास मिळाले नाहीत त्यांनी महाद्वारापासून दर्शन घेऊन परतले मंगळवारी रोजी भाविकांची गर्दी पाहून फ्री पासची २०,००० जास्त गर्दि पडल्यास ३०,००० फ्रिपास ची व्यवस्था केली आहे. यामुळे येणाèया भाविकांची हेळसांड होणार नाही. आणि दर्शन व्यवस्थीत होईल. वाढत्या गर्दीमुळे अनेक भाविकांनी महाद्वारातूनच दर्शन घेणे पसंत केले.

सुगरणीने दिला तृतीयपंथीयांना हळदी कुंकवाचा मान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या