24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeउस्मानाबादयेडशी येथे चाकूचा धाक दाखवून महिला डॉक्टरास लुटले

येडशी येथे चाकूचा धाक दाखवून महिला डॉक्टरास लुटले

एकमत ऑनलाईन

येडशी : जिन्याच्या दरवाज्याच्या जाळी कट करुन घरात घुसून महिला डॉक्टरास चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयास लुटले. ही खळबळजनक घटना उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे गुरुवारी (दि.२३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या धाडशी दरोड्यामुळे येडशी हादरली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येडशी येथील डॉ. विद्या सतीश जेवे यांचे येडशी येथील गणेश नगर येथे धन्वंतरी क्लिनिक आहे. यावेळी डॉ. जेवे या गुरुवारी (दि.२३) रात्री घरी झोपल्या असता अनोळखी दोन जणांनी जिन्याची दरवाजाची जाळी कट करून घरात प्रवेश केला. यावेळी डॉ. विद्या जेवे यांच्या रुममध्ये दोन चोरट्यांनी जावून त्यांना धमकावून चाव्या कोठे आहेत, सांगा आम्ही तुम्हाला मारणार नाही, अशी धमकी देवून चाकु व रॉडच्या सहाय्याने बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील ६ लाख रोख रक्कम व १७ तोळे सोन्याचे दागीने (किंमत ३ लाख ६ हजार रुपये) व दवाखान्यातील कांऊटरमधील १० हजार रुपये असा ९ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, डीवायएसपी अंजुम शेख, सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश शिंदे आदींनी भेट दिली. तसेच श्वान पथकाला सुद्धा पाचरण करण्यात आले होते. या घडलेल्या घटनेमुळे येडशी परीसरात ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच येडशी येथे सतत होणा-या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. याप्रकरणी डॉ विद्या सतीश जेवे यांच्या फिर्यादीवरुन उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आसून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे हे करत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या