उस्मानाबाद : शहरातील एका २६ वर्षीय महिलेशी (नाव- गाव गोपनीय) तिच्या घर मालकाने मागील चार महिन्यांपासून जवळीक साधून वेळोवेळी लैंगीक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान त्या महिलेने त्यास नकार दिला असता त्याने तिला मारहान केली. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यावर त्या महिलेने त्यास घरकामाच्या मोबदल्याचे पैसे मागीतले असता त्याने त्या महिलेचा दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित महिलेने आनंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून संबंधित घर मालकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.